सुरमईचा अंत्यसंस्कार

सुरमईचा अंत्यसंस्कार

सायली चिंटूला बघते. तो रडत आहे।
Sayaliचिंटू? तू ठीक आहेस का?
Chintuनाही, सुरमई वारला!
Sayaliतुझा पाळीव मासा?
Chintuहो, आणि तो खूप लहान होता!
Sayaliमी तुला मदत करू शकते कारण मला अंत्यसंस्कारबद्दल बरीच माहिती आहे।
सायली आणि चिंटू माशाला बाथरूममध्ये घेऊन जातात।
Sayaliसुरमईला समुद्रात जलसमाधी मिळू शकते।
Sayaliतुला सुरमईसोबतच्या काही चांगल्या आठवणी आठवायच्या आहेत का?
Chintuहम्म… मला सुरमईला पोहताना बघायला आवडायचं।
Chintuआणि त्याला माझ्यासोबत टीव्ही बघायला आवडायचं।
Chintuआणि माझी गाणीसुद्धा त्याला खूप आवडायची!
Sayaliखूप छान, चिंटू।
सायली सुरमई ला टॉयलेटच्या मध्ये टाकते ।
Sayaliतू निरोप देण्यासाठी तयार आहेस ?
सुरमई पोहायला लागतो।
Chintuसुरमई!
Sayaliअरे… मासा जिवंत आहे।
Chintuआणि आता? आपण सुरमईला कमोडमधून बाहेर कसे काढणार?
Sayaliमाफ कर, त्याबाबत मी तुला मदत नाही करू शकत।