जया आणि तिचा नवरा साहिल बाहेर जाण्यासाठी बाथरूममध्ये तयार होत आहेत।
अरे देवा, नाही!
काय झालं?
मला एक पांढरा केस आला आहे!
तुझा पहिला पांढरा केस! आपण पार्टी करूया!
हे अजिबात मजेशीर नाहीये।
सोरी, पण काही हरकत नाही, तो फक्त... एक पांढरा केस आहे।
मला माझे केस डाय करावे लागतील!
का?
पांढरे केस यायला मी अजून तयार नाहीये, मी खूप तरुण आहे!
तरुण लोकांचेही पांढरे केस असतात।
आणि तुझे सगळे केस पांढरे झाल्यावर तू खूप सुंदर दिसशील।
सगळे केसं?
आता नाही, तीस किंवा चाळीस वर्षांत।
बघ, पांढरे केस म्हाताऱ्या लोकांचे असतात।
जया... म्हातारे होण्यात काय अडचण आहे?
प्रत्येक जण म्हातारा होतो।
ते खरं आहे, पण…
आपण दोघे एकत्र म्हातारे होऊ. मी तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहीन।
मी सुद्धा, मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन आणि तू केसांशिवाय खूप हँडसम दिसशील।
काय?
बरं... एके दिवशी तुझे सगळे केस गळून जातील ना.
प्रत्येक जण म्हातारा होतो, साहिल।
अरे देवा, नाही।