खूप धोकादायक

खूप धोकादायक

Nehaमी करू शकत नाही, सायली.
Sayaliहो, तू करू शकतेस, काळजी करू नकोस.
Nehaमला भीती वाटते! हे खूप धोकादायक आहे!
Nehaमला जायचं नाही!
Sayaliनेहा… आपण ठीक असू.
Nehaआणि तुला कसं माहीत?
Sayaliबरं, खूप लोक ते करतात.
Sayaliनेहा… सगळं ठीक होईल.
Sayaliमी तुझ्यासोबत आहे आणि आपण एकत्र जाऊ.
Nehaधन्यवाद, सायली. तू खूप चांगली मैत्रीण आहेस.
Nehaठीक आहे.
Nehaमला वाटतं मी तयार आहे!
Nareshतू रोलर कोस्टर वर जाणार आहेस का नाई?
Nareshखूप लोकं वाट पाहत आहेत.
Nareshही देशातील सर्वात उंच आणि जुनी रोलर कोस्टर आहे.
Sayaliथांब… सर्वात उंच? आणि सर्वात जुनी?!
Nehaठीक आहे, मी हे करणार आहे!
Nehaआणि माझी मैत्रीण सायली माझ्यासोबत येणार आहे!!
Nehaथांब… सायली, तू का पळतेस? कुठे जातेस?
Sayaliमाफ कर, नेहा! मला त्या रोलर कोस्टरवर बसायचं नाही!
Sayaliहे खूप धोकादायक आहे!