तुझी प्रेयसी कुठे आहे?

तुझी प्रेयसी कुठे आहे?

रुपा विमानतळावर आहे.
ती काउंटरवरील माणसाशी बोलत आहे.
Narratorनमस्कार! तुम्हाला मदत हवी आहे का?
Rupaहो! मी बार्सिलोना ला जात आहे…
Rupa…आणि मला माझ्या प्रेयसीच्या शेजारी विमानात बसायचं आहे.
Narratorठीक आहे, आमच्याकडे दोन शेजारी सीट्स आहेत.
Rupaछान!
Narratorहम्म… तुझी प्रेयसी कुठे आहे?
Rupaमला माहिती नाही. तुम्ही तिला शोधायला मदत करू शकता का?
Narratorती कशी दिसते?
Rupaहम्म… ती उंच आहे, तिचे काळे केस आहेत…
Narratorठीक आहे.
Rupaतिला खेळ खेळायला आणि नाचायला आवडतं…
Narratorआह…
Rupaतिला प्राणी खूप आवडतात
Rupa… पण ती खूप चॉकलेट खाते.
Narratorठीक आहे… तुझ्या प्रेयसीचं नाव काय आहे?
Rupaअह, मला माहिती नाही.
Narratorतुला तुझ्या प्रेयसीचं नाव माहिती नाही?
Rupaमाझी प्रेयसी अजून नाही.
Rupaतुम्ही मला एक शोधायला मदत करू शकता का?
Where Is Your Girlfriend? - Marathi Story with Audio | Duostories