मी आजारी आहे

मी आजारी आहे

Chintuबाबा, मी आजारी आहे!
Amitअरे नाही!
अमित चिंटूच्या डोक्याला स्पर्श करतो.
Amitतुला ताप नाही.
Chintuपण माझ्या डोळ्याला खूप दुखतंय! मला डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये जायचं आहे!
Amitठीक आहे.
ते डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये जातात.
Rekhaनमस्कार चिंटू, तू कसा आहेस?
Chintuमी आजारी आहे! माझ्या डोळ्याला दुखतंय!
Rekhaअरे नाही! मी तुला मदत करू शकते.
डॉक्टर चिंटूच्या डोळ्याकडे पाहते.
Rekhaहम्म… तुझा डोळा ठीक आहे.
Chintuअरे हो? मग… माझा हात दुखतोय!
डॉक्टर चिंटूच्या हाताकडे पाहते.
Rekhaतुझा हातही ठीक आहे.
Amitडॉक्टर, माझा मुलगा ठीक आहे का?
Rekhaहो.
Rekhaचिंटू, तू आजारी नाहीस.
Chintuनाही! मी खूप आजारी आहे!
Rekhaचिंटू… तू इथे आहेस कारण मी तुला नेहमी चॉकलेट देते?
Chintuहम्म… हो…
Amitचिंटू.
Chintuअह… मला आता माझं चॉकलेट मिळेल का?